शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: December 4, 2014 03:08 IST

हिट अण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या रक्तात प्रमाणापेक्षा अधिक मद्य असल्याची साक्ष बुधवारी रासायनिक विश्लेषक भालशंकर यांनी

मुंबई : हिट अण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या रक्तात प्रमाणापेक्षा अधिक मद्य असल्याची साक्ष बुधवारी रासायनिक विश्लेषक भालशंकर यांनी सत्र न्यायालयात दिली़ त्यामुळे आता सलमानने घटनेच्या दिवशी मद्यपान केले होते, याला दुजोरा मिळाला असून त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत़ कारण हा अपघात झाला तेव्हा सलमानने मद्यपान केले होते, असा सरकारी पक्षाचा दावा असून, या साक्षीने त्यालाही पुष्टी मिळाली आहे़मानवी शरीरात सर्वसामान्यपणे ३० एमजी मद्य असते व औषध घेतल्यानंतर याचे प्रमाण ४० एमजी होते़ तर मुंबई मद्य प्रतिबंधक कायद्यानुसार याची मर्यादा ५० एमजी आहे़ मात्र सलमानची रक्तचाचणी केली असता त्यात याचे प्रमाण ६२ एमजी होते, असे भालशंकर यांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना न्यायालयाला सांगितले़मात्र यावर सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी आक्षेप घेतला़ ते म्हणाले, वांद्रे पोलिसांनी जे़ जे़ रुग्णालयाला एकच रक्ताचा नमुना पाठवला असल्याचे म्हटले आहे़ पण जे़ जे़ रुग्णालयाने फॉरेंसिक लॅबला रक्ताचे दोन नमुने पाठवले असल्याचे नमूद केले आहे़ ही तफावत स्पष्ट होण्यासाठी आधी जे़ जे़ रुग्णालयातील डॉक्टरची साक्ष होणे आवश्यक आहे़ त्यामुळे डॉक्टरांची साक्ष झाल्यानंतर भालशंकर यांची उलटतपासणी आम्ही घेऊ, असे अ‍ॅड़ शिवदे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले़ ते न्यायालयाने मान्य केले़ त्यानंतर मोटार निरीक्षक केसरकर यांची साक्ष नोंदवण्यात आली़ केसरकर यांनी अपघात झालेल्या लॅण्ड क्रुझर गाडीचा तपशील न्यायालयाला दिला़ यावरील पुढील सुनावणी १५ डिसेंबरला होणार आहे़ सलमानने १२ वर्षांपूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू असून यात त्याला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ बुधवारी सलमान त्याच्या दोन बहिणींसोबत न्यायालयात हजर होता़ भालशंकर यांची साक्ष सलमान निरागस चेहऱ्याने ऐकत होता़ १५ डिसेंबला सुनावणीला हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने सलमानला दिली आहे, मात्र त्यापुढील सुनावणीला त्याला हजर राहावे लागेल़ (प्रतिनिधी)