Said Pankaja Munde Stay close to those who speak the truth | गोड बोलणाऱ्यांपेक्षा खरं बोलणाऱ्यांच्या मागे उभे रहा : पंकजा मुंडे

गोड बोलणाऱ्यांपेक्षा खरं बोलणाऱ्यांच्या मागे उभे रहा : पंकजा मुंडे

बीड (पाटोदा ) : गोड बोलणारांपेक्षा खरं बोलणाऱ्यांच्या मागे उभे रहा. मला कशाचीही अपेक्षा नाही, फक्त तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. तर जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही कायम लढत राहणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यात. संत वामनभाऊ महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी सोहळा पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.

राजकीय धामधुमीनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण एकाच व्यापीठावर पाहायला मिळाले. संत वामनभाऊ महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, समाजातील वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याची शिकवण लोकनेते मुंडे साहेबांनी आम्हाला दिली आहे, त्यामळे कोणतेही पद किंवा सत्ता असो वा नसो वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू. आयुष्यात अनेक संघर्ष वाट्याला आले, धीर सोडू नका, सदैव तुमच्यासाठीच मी काम करत राहणार आहे. गोड बोलणारांपेक्षा खरं बोलणाऱ्यांच्या मागे उभे रहा असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

तर संत वामनभाऊ महाराजांची एक भक्त म्हणून या गडावर मी नेहमी येते व पुढेही येतच राहणार आहे, त्यांच्या प्रेरणेमळे पांच वर्षात जिल्ह्याची सेवा मला करता आली, ही सेवा अशीच पुढे करण्यासाठी तुमच्या मनातील माझे स्थान कायम ठेवा अशी भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली

 

Web Title: Said Pankaja Munde Stay close to those who speak the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.