Sachin Sawant Resigned: सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा; नाना पटोलेंवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:46 PM2021-10-19T19:46:23+5:302021-10-19T19:53:39+5:30

Sachin Sawant angry over Nana Patole on Atul Londhe's appointment: काँग्रेसमध्ये पक्ष पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. यामुळे नाना पटोले यांनी अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते म्हमून नियुक्त केले आहे.

Sachin Sawant Sent resignation letter to Sonia Gandhi of congress spokesperson Maharashtra | Sachin Sawant Resigned: सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा; नाना पटोलेंवर नाराज

Sachin Sawant Resigned: सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा; नाना पटोलेंवर नाराज

Next

गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळणारे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे (Atul Londhe) यांची नियुक्ती झाल्यामुळे ते नाराज होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे लोंढे हे खास मानले जातात. 

काँग्रेसमध्ये पक्ष पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते म्हमून नियुक्त केले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सचिन सावंत यांना प्रवक्ते पदावरून हटवून मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाच्या समितीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे सचिन सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. यामुळे सचिन सावंत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. 

या नाराजीतून सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी आपल्याला प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी ट्विटर हँडलवरून प्रवक्तेपदाचा उल्लेखही हटविला आहे. 

काँग्रेसमध्ये फेरबदल खालील प्रमाणे
अतुल लोंढे मुख्य प्रवक्ते, तर डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौ-याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी, शाम उमाळकर, संजय बालगुडे, यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे,  सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Sachin Sawant Sent resignation letter to Sonia Gandhi of congress spokesperson Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.