नागपूर मनपाने तोडला ‘पीएफ’चा नियम

By Admin | Updated: March 5, 2017 20:12 IST2017-03-05T20:12:03+5:302017-03-05T20:12:03+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे कर्मचा-यांच्या हक्कांवर गदा आणणा-या आस्थापनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

The rule of PF broke out in Nagpur Municipal Corporation | नागपूर मनपाने तोडला ‘पीएफ’चा नियम

नागपूर मनपाने तोडला ‘पीएफ’चा नियम

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे कर्मचा-यांच्या हक्कांवर गदा आणणा-या आस्थापनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. २०१६ साली नागपूर कार्यालयातर्फे विभागातील एकूण २० आस्थापनांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यात नागपूर महानगरपालिकेचादेखील समावेश आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत विभागात भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या किती होती, दावे न केलेल्या खात्यांची संख्या किती होती, किती रक्कम काढण्यात आली तसेच नियम तोडणा-या किती आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१६ मध्ये विभागातील एकूण २० आस्थापनांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात आले. यात नागपुरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील आस्थापनांचा समावेश आहे. 
२०१६ मध्ये कुठलाही दावा न केलेल्या खात्यांची संख्या ६ लाख ९१ हजार २८३ इतकी होती. या खात्यांमध्ये २९८ कोटी ७२ लाख २१ हजार १०८ इतकी रक्कम जमा आहे. या कालावधीत ५९ हजार ९१७ दाव्यांचा निपटारा करण्यात आला व ३१८ कोटी ७२ लाख ९४ हजार ५७५ रुपये काढण्यात आले.
सदस्यांच्या निधीची कार्यालयाला माहितीच नाही
दरम्यान, या माहितीच्या अधिकारातून आणखी एक आश्चर्यजनक बाब समोर आली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या १५ लाख १६ हजार ४०५ इतकी होती. मात्र या सदस्यांचा एकूण किती निधी जमा आहे, याची माहितीच कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
विभागात लाखाहून अधिक पेन्शनधारक
नागपूर विभागात कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत १ लाक ४ हजार १२३ पेन्शनधारक आहेत. २०१६ मध्ये पेन्शनधारकांना १२ कोटी २४ लाख १४ हजार ६९९ रुपयांचा निधी देण्यात आला. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती, विधवा, अपत्य, आश्रित आई-वडील, अनाथ, स्थायी अक्षमता असाप्रकारच्या ६ पेन्शनचा समावेश होतो.
 

Web Title: The rule of PF broke out in Nagpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.