शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पकडली ४० लाखांची रोकड

By admin | Updated: October 11, 2014 05:31 IST

कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत निवडणूक विभागाने शुक्रवारी दुपारी केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाख रुपयांची रोकड आढळली़

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत निवडणूक विभागाने शुक्रवारी दुपारी केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाख रुपयांची रोकड आढळली़ जिल्ह्यात प्रचंड चर्चा झाल्याने व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबतच्या मेसेजेसला उधाण आले होते. त्या बिल्डरच्या मते, ही रक्कम ते एका प्रकल्पानिमित्त कराव्या लागणाऱ्या रजिस्ट्रेशनसाठी घेऊन जात असल्याचेही सांगण्यात आले. दुपारच्या वेळेत निवडणूक भरारी पथकासह रामनगर पोलीस ठाण्याच्या स्क्वॉडने ही गाडी तपासणीसाठी अडवली. त्या वेळी गाडीच्या मागील आसनावर ही रक्कम आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबतची चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नाकाबंदीत कळव्यात सापडले ११ लाख २६ हजारठाणे - कळवा, पारसिक नाका येथे गुरुवारी रात्री ठाणे पोलिसांच्या नाकाबंदीत एका इको कारमध्ये ११ लाख २६ हजारांची रोकड सापडली. ठाण्यात राहणारे चार जण कल्याणमधून हे पैसे बँकेत भरण्यासाठी घेऊन येत असताना ही कारवाई करण्यात आली. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे. टी. घावटे यांचे पथक पारसिक नाका येथे नाकाबंदी करीत होते. याचदरम्यान, पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. त्या वेळी ही रक्कम सापडली. त्यानंतर गाडीतील चौघांची चौकशी केली असता ते एका रिटेल प्रा.लि. कंपनीचे कर्मचारी असून, त्या कंपनीचे गोळा केलेले पैसे बँकेत भरण्यासाठी ठाण्यात घेऊन येत होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. कळवा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. तसेच या पैशांबाबत आयकर विभाग आणि निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली असून, ही रोकड आयकर विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. तसेच कंपनी आणि त्या रोकडबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)