शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शाही स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 7:45 PM

तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली.

ठळक मुद्दे राम मंदिर आणि मशीद जवळच असल्याने राम रहीमचा सुंदर मिलाफ

अमोल अवचितेफलटण : तुझी सेवा करेन मनोभावे हो !  माझे मन गोविंद रंगले हो! नवसिले माझे नवसिले हो! पंढरीचे दैवत हो बाप ! रुखमादेवी विठ्ठल हो! चित्त चैतन्य चोरुनी  नेले!    चांदोबाचा लिंब येथे रंगलेल्या पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन तरडगाव मुक्कामानंतर शाही स्वागतात ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विमानतळ मैदानावर विसावली.   तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली. पहिला विसावा दत्त मंदिर काळज सुरवडी, दुसरा विसावा निंभोरे ओढा तर फलटण दुध डेअरी येथे तिसरा विसावा घेऊन फलटण नगरीत संध्याकाळी सहाच्या सुमारास विसावली.     तालुका दूध संघावर पालखी दिंड्यातील विणेकऱ्यांचे श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. निंबाळकर देवस्थानने  पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी नगरातील भक्तांनी मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या.

फलटणचे ग्राम दैवत असलेल्या श्री राम मंदिरात वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बाजूलाच एक मुखी दत्त मंदिर आहे. मंदिरातच वारकरी विसावा घेत होते. तर काहींनी फुगडीचे फेर धरले होते. राम मंदिर आणि मशीद जवळच असल्याने राम रहीमचा सुंदर मिलाफ येथे दिसून आला.   सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मात्र पावसाची हजेरी चुकल्यासारखी वाटत होती. उत्साहाने वारकरी भजनात तल्लीन होऊन मार्गावर चालत होते.फलटण नगरीत पालखीच्या स्वागताची उत्सुकता दिसून येत होती. ठिकठिकाणी पाणी वाटप , अन्नदान करण्यात येत होते. मुबंईतील माऊली फाउंडेशनकडुन फलटण नगरीत येऊन मोफत औषध वाटप आणि अन्नदान करण्यात आले. दिंडी पालखी स्थळाजवळ रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे नळ बसविले आहेत.     वारकऱ्यांसाठी उत्तम सोय करण्यात आली  होती. फलटण नगरीत एकूणच भक्तिमय वातावरण होते. गावकरी वारकऱ्यांची सेवा करण्यात व्यस्त होते.  

........फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजा होते. फलटण हे एक पुरातन शहर असून  बाणगंगा नदी तिरावर वसलेले आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जात असे.  दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे.  

*  पालखी शुक्रवारी फलटण मधुन सकाळी मार्गस्थ होऊन बरडमध्ये मुक्कामी विसावणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी