शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

२०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 5:10 PM

एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील दोन गटांमध्येच अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत. यामुळे एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. आज राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

जागावाटपावर बोलताना तटकरे यांनी नाशिकवर दावा असल्याचे म्हटले आहे. या जागेबाबत निर्णयास्पद चर्चा झालेली आहे आज किंवा उद्या बैठक होईल आणि नाशिकचा तिढा सुटेल, असे तटकरे म्हणाले. तसेच साताऱ्याच्या जागेबाबत देखील चर्चा झालेली आहे राजकारणात नेहमी परिवर्तन होत असते. माढामध्ये जे काही घडलं ते सर्वांना माहिती आहे, असे तटकरे म्हणाले. 

रोहित पवारांच्या भावा-बहीणीतील करारावरील वक्तव्यावर तटकरे यांनी भाष्य केले आहे. भावा बहिणीचा कुठला करार झाला आहे,  मला माहीत नाही. 2019 मध्ये रोहित पवार भाजपाकडे तिकीट मागायला गेले होते, कदाचित तो करार असावा. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून भाजपकडे जावे यावर रोहित पवार यांची सही होती. त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय माहित नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. 

शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केले, त्याबाबतची प्रतिक्रिया मी काही देणार नाही सुनेत्रा वहीनींची प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे, असे तटकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी गीते यांच्यावरही तोंडसुख घेतले. 2019 मध्ये काँग्रेस, शेकाप माझ्यासोबत होता, याबाबत दुमत नाही. 2019 मध्ये गीतेंसोबत मोदी साहेबांची ताकद, अखंड शिवसेना त्यांच्या पाठीमागे होती. हद्दपारीची भाषा त्यांच्या तोंडी जास्त शोभते, कारण 2019 मध्ये जयंत पाटील यांचं संस्थान खालसा केल्याशिवाय गप्प  बसणार नाही अशी दर्पोक्ती देखील केली होती, असे तटकरे म्हणाले.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४