शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:07 AM

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.'

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर पक्ष आणि कुटुंब फोडल्याचा आरोप केला. भाजपने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाटी शिवसेना पक्ष काढला आणि भाजपने तो पक्ष फोडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर नेत्यांनाही अनेक खोचक सवाल केले. 

अजितदादांना विलेन करण्याचे काम...रोहित पवार म्हणाले की, आज देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलू नये, मोठे नेते आपापसात गुंतवून राहावेत, यासाठी भाजपने आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आमच्यातच उत्तर-प्रत्युत्तर देत आहोत आणि तिकडे भाजप बाजुला राहत आहे. पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर फोडले जात आहे. अजित दादांना विलेन ठरवण्याचे काम चार-पाच नेते करत आहेत. तिकडे भाजप एसीत बसून मजा पाहत आहे आणि आम्ही आमच्यातच भांडतोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

मग तुम्ही विकास केला नाही का?भाजपसोबत गेलेले आज म्हणत आहे की, आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. मग तुम्ही पदावर असताना विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. या सगळ्या घडामोडी होत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडीलांनी मला प्रश्न केला की, तू वयस्कर होशी, 80च्या पुढे जाशील, तेव्हा अशीच भूमिका घेणार का? माझ्याच आई-वडिलांना हा प्रश्न पडत असेल, तर सामान्यांना पडणारच ना... 

सत्तेसाठी दोन कुटुंब फोडलेमी माझ्या पक्षासोबत, माझ्या आजोबांसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींना राज्यातील जनता व्यक्तिगत घेत आहे, त्यामुळे जनता आमच्या सोबत कायम असेल. कुटुंब कुणी फोडले, पक्ष कुणी फोडला, हे सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी भाजपने राज्यातील दोन मोठे कुटुंब फोडले, हे लोकांना पटले नाही. एकेकाळी भाजपविरोधात बोलणारे सत्तेसाठी त्यांच्यासोबत बसले आहेत, हे लोकांना पटणारे नाही. हे लोक पवार साहेबांसोबत असे करू शकतात, तर सामान्यांचे काय, असा सवाल प्रत्येकाला पडला आहे, अशी टीकाही रोहित पवारांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष