शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

समीक्षक अनंत देशमुख, कवी डॉ. महेश केळुसकर यांना कोमसापचे पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 8:32 PM

ज्येष्ठ समीक्षक आणि चित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना कोमसापच्या ‘कोकण साहित्य भूषण’ तर ‘निद्रानाश ’या कवितासंग्रहासाठी डॉ महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठाणे - ज्येष्ठ समीक्षक आणि चित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना कोमसापच्या ‘कोकण साहित्य भूषण’ तर ‘निद्रानाश ’या कवितासंग्रहासाठी डॉ महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. हा पुरस्कार सोहळा १० मार्चला मधु मंगेश कार्णिक यांच्या अध्यक्षतेखाली नाटय संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत होणार आहे.कोकणमराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) चे यंदाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयीनेतर पुरस्कार बुधवारी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी घोषित केले. शिल्पा सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर’ या चरित्र पुस्तकाला ‘धनंजय कीर स्मृती’ प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. चरित्र आत्मचरित्राचा श्रीकांत शेट्ये स्मृती द्वितीय पुरस्कार उमाकांत वाघ यांच्या ‘ वळख’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. कोमसापचा विशेष पुरस्कार विकास वºहाडकर आणि प्रमोद व-हाडकर यांनी संपादित केलेल्या ‘बॅनरांजली’ ला घोषित झाला आहे. काव्य संग्रहाचा आरती प्रभु स्मृती प्रथम पुरस्कार अनुजा जोशी यांच्या ‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ या कविता संग्रहाला तर वसंत सावंत स्मृती द्वितीय पुरस्कार प्रशांत डिंगणकर यांच्या ‘दगड ’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. ललित गद्यासाठी अनंत काणेकर स्मृती प्रथम पुरस्कार विनया जंगले यांच्या ‘मुक्या वेदना बोलक्या संवेदना’ या पुस्तकाला आणि द्वितीय पुरस्कार आर. एम. पाटील यांच्या ‘आठवणीतील पानगळ साठवणीतील गुलमोहर ’ ला मिळाला आहे. कथासंग्रहासाठी व्ही. सी. गुर्जर स्मृती प्रथम पुरस्कार भा.ल.महाबळ यांच्या ‘ओळख’ कथासंग्रहाला आणि विद्याधर भागवत स्मृती द्वितीय पुरस्कार अरविंद हेब्बार यांच्या ‘दरवळ ’ या कथासंग्रहाला मिळाला आहे. याशिवाय समीक्षेचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. अंजली मस्करेन्हस यांच्या आदिवासी लोककथा मीमांसा , बालवाङ्मय पुरस्कार रेखा जेगरकल यांच्या स्वाती, अक्षय आणि तुम्ही सारे ला, संकीर्ण वाङ्मयीन पुरस्कार डॉ किरण सावे यांच्या ‘चावार्क दर्शन प्रासंगिकता ’ आणि वैभव दळवी यांच्या ‘सामुद्रायन’ ला मिळालाय. नाट्य एकांकिका पुरस्कार शांतीलाल ननावरे यांना ‘ही वाट दूर जाते’ साठी जाहीर झाला आहे.

टॅग्स :marathiमराठीkonkanकोकण