शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्याचा कणा मोडणार

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल खात्यातील कर्मचारी शुक्रवारी १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व तहसील कार्यालयातील कामकाज

आजपासून कर्मचारी संपावर : कामकाज होणार ठप्पनागपूर : प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल खात्यातील कर्मचारी शुक्रवारी १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गतवर्षी संप करण्यात आला होता. शासनाने या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही, म्हणून यावर्षी संघटनेने धरणे, लेखणी बंद आंदोलने केली. मात्र याची दखल न घेतल्याने संघटनेने संपाचे हत्यार उपसले. शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कामावर येणार नाहीत, असे संघटनेच्या विभागीय शाखेने महसूल उपायुक्तांना तर जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळविले आहे. या संपाला राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना, राज्य स्टेनोग्राफर संघटना, राज्य शासकीय वाहन चालक संघटना, राज्य नायब तहसीलदार-तहसीलदार संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महसूल खात्याशी संबंधित या संघटना असून, या सर्वांनीच संपात सहभाग घेतला तर प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल खात्यातील यंत्रणाच कोलमडून पडणार आहे.आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. सरकारनेच आता याबाबत निर्णय घ्यावा, असे संघटनेचे विभागीय अध्यक्ष गोपाल इटनकर, सरचिटणीस सतीश जोशी यांनी सांगितले. ‘महसूलदिना’ला सहकार्यदरवर्षी १ आॅगस्टला महसूलदिन साजरा केला जातो. यानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा गौरव केला जातो. संप असला तरी या कार्यक्रमाला सहकार्य करण्याची भूमिका महसूल कर्मचारी संघटनेने घेतली आहे. (प्रतिनिधी)संपाचा परिणामनागपूर जिल्ह्यात सरासरी ६०० ते ६५० महसूल कर्मचारी आहेत. ते संपात सहभागी झाल्यास दैनंदिन कामकाजाशिवाय महत्त्वाच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. कार्यालयात रोज येणाऱ्या डाकेचे वाटप होणार नाही. सेतूमध्ये आलेल्या अर्जांची तपासणी महसूल कर्मचारी करतात, हे कामसुद्धा होणार नाही. मंत्रालयातून दर दिवशी विविध माहिती व आकडेवारी जिल्हा कार्यालयाला मागितली जाते.अधिकारी कामावर येणार असले तरी लिपिकाशिवाय फाईल हलत नाही, हे येथे उल्लेखनीय. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अधिकाऱ्यांचा ताण वाढणार आहे.