ठाणे : ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल ९१.४२ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे ९२.३९ टक्के मुली, तर ९०.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचे निकालपुस्तिकेतून दिसून आले. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’नुसार हा निकाल जाहीर करण्यात आला. अनुत्तीर्णांसाठी फेरपरीक्षा १८ जुलैला होणार आहे. ठाणे जिल्ह्यात ४९ हजार ४३७ मुलींनी, तर ५३ हजार १६३ मुलांनी अशा एकूण एक लाख दोन हजार ६०० परीक्षार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यात ४८ हजार ११९ मुले, तर ४५ हजार ६७६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९१.४२ टक्के आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विविध परिसरनिहाय निकालानुसार भार्इंदरमध्ये ९५.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल नवी मुंबईमध्ये ९५.२७ टक्के, मुरबाड ८८.९३ टक्के, कल्याण ग्रामीण ८८.९३ टक्के, अंबरनाथ ९१.७४ टक्के, भिवंडी ८४.६१ टक्के, ठाणे शहराचा निकाल ९१.४१ टक्के, कल्याण-डोंबिवलीचा ९१.४७ टक्के, तर भिवंडी ग्रामीणचा ८८.९३ टक्के, शहापूरचा ८८.२२ टक्के, उल्हासनगरचा ८९.६४ टक्के निकाल आहे. जुलै महिन्यात दहावीची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील बुधवारी १५ जूनला दुपारी ३ वाजता गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख आणि कलचाचणीचे अहवाल त्या दिवशी दिले जातील.
संबंधित वृत्त /२
>सरस्वती शाळेची जान्हवी गोरे ९९.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. कॅरममध्ये राष्ट्रीय खेळाडू असलेल्या जान्हवीने ५०० पैकी ४९६ गुण प्राप्त करून यशाचे शिखर गाठले आहे. तिला मराठी विषयात ९३, संस्कृतमध्ये ९७, इंग्रजीमध्ये ९३, गणितमध्ये ९८, विज्ञान ९४ आणि समाजशास्त्रात ९४ असे गुण प्राप्त झाले असून खेळाचे तिला २० गुण मिळाले आहे. पहिलीपासून तिने कोणताही क्लास लावला नाही. दहावीतही स्वत:, कुटुंबाच्या आणि सरस्वती सेकंडरी स्कूलच्या शिक्षकांच्या मदतीने तिने हे यश संपादन केले. शंकांंचे निरसन करण्यासाठी तिचा भाऊ निखिल याने तिला खूप मदत केली असल्याचे तिने ‘लोकमत’ला सांगितले.
>दहावी असली तरी वर्षभर अभ्यासाचे नियोजन फार काही केले नव्हते. पण, लिखाणाचा सराव भरपूर केला आणि त्याचा फायदा बोर्डाचे पेपर सोडवताना झाल्याचे ती म्हणाली. जान्हवीला गणित हा विषय अत्यंत आवडतो आणि तिला अपेक्षेप्रमाणे या विषयात गुण मिळाले आहेत. मला ९५ टक्के मिळतील, अशी अपेक्षा होती. पण, अपेक्षेपेक्षाही अधिक टक्के मिळाल्याने माझे कुटुंब, मित्र परिवार आणि शिक्षक अत्यंत खूश असल्याचे जान्हवीने सांगितले.
>दहावीचे वर्ष असतानाही ती जानेवारीत कॅरमच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये दुसरी येण्याचा मान पटकावला. दहावीचा अभ्यास आणि कॅरमचा सराव याचा तिने उत्तम ताळमेळ बसवला. पहाटे ५.३० वाजता दीड तास ती कॅरमचा सराव करायची आणि त्यानंतर उर्वरित वेळेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत असे. ती वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार असून तिला सीए होण्याची इच्छा आहे.
>गेल्या वर्षीपेक्षा
ठाण्याचा टक्का घसरला
दहावीच्या निकालात ठाणे जिल्ह्याची यंदा घसरण झाली आहे. जिल्ह्याचा निकाल यंदा ९१.४२ टक्के लागला आहे. मागील वर्षी हा निकाल ९३.१ इतका होता. यंदा ठाणे जिल्ह्यातून १ हजार १५९ शाळांमधून एक लाख दोन हजार ६०० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ५३ हजार १६३ मुले, ४९ हजार ४३७ मुली होत्या. यामधून ९३ हजार ७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
>जिल्ह्यातील १ हजार १५९ शाळांपैकी २३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर ४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
>परीक्षेत २८ हजार ४४६ विद्यार्थ्यंाना विशेष प्रावीण्य-डिस्टिंक्शन मिळाले आहे. ३४ हजार ३०३ विद्यार्थ्यांना प्रथम आणि २५ हजार १७० विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे. ५ हजार ८७६ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.
पुन्हा परीक्षेला बसलेल्या (रिपीटर) १६ हजार १४६ विद्यार्थ्यांपैकी सात हजार २८४
>जिल्ह्याच्या आदिवासी विभागातील तीन शासकीय माध्यमिक आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात शहापूर तालुक्यातील अघई, भिवंडीतील भिनार आणि मुरबाडच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळांचा समावेश आहे.
>ठाणे महापालिका क्षेत्रातील श्री माँ बालनिकेतन, नानिक हायस्कूल, पी.ई. सोसायटी, नवोदय इंग्लिश स्कूल, वीझ इंग्लिश हायस्कूल, सेंट लॉरेन्स, कॅरॅमल हायस्कूल, सेंट झेविअर्स, सरस्वती विद्यालय, होली क्रॉस, ए.के. जोशी, ठाणे पोलिश, श्री मावळी मंडळ अशा ४९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
>गणितप्रेमी हरेश्वर मोतीराम मोरेकर संचालित विनाशुल्क मोरेकर गणित अभ्यासिकेचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला आहे. निकालानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष रमाकांत कोळी, समाजाचे माजी कार्यवाहक नारायण ज. कोळी यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.४२ टक्के
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST
ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.४२ टक्के
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}