शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू बाइक्स

By admin | Updated: February 25, 2016 03:08 IST

जंगलामध्ये जखमी वन्यप्राण्याची सुरक्षित सोडवणूक करण्यासाठी आता रेस्क्यू बाईकची मदत घेतली जाणार आहे. अशा दोन रेस्क्यू बाईक्स आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

मुंबई : जंगलामध्ये जखमी वन्यप्राण्याची सुरक्षित सोडवणूक करण्यासाठी आता रेस्क्यू बाईकची मदत घेतली जाणार आहे. अशा दोन रेस्क्यू बाईक्स आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.वनसंरक्षकाबरोबरच वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी माय व्हेट या चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मधुरिता गुप्ता यांनी दोन रेस्क्यू बाईक्सची निर्मिती केली आहे. या बाईक्सचे उदघाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले व बाईक्सच्या चाव्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुर्पूत केल्या.यावेळी आ. सुरेश धोटे, वन विभागाचे सचिव विकास खारगे, माय व्हेट चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या रेस्क्यू बाईक्समुळे मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षादरम्यानची परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे. जंगलामध्ये गस्त घालण्याबरोबरच वेगवेगळ्या परिस्थितीत या बाईक्सचा उपयोग करता येईल. कशा आहेत बाईक्स?३६० अंशामध्ये निरिक्षण करता येईल अशा या बाईक्स असून बाईक्सला सर्व बाजूंनी लोखंडी जाळी बसवली आहे.त्यामुळे वन्यजीवांच्या हल्ल्यापासून संरक्षण होण्यास मदत होणार असून वाहनाचे संतुलन व्यवस्थित राहील याची दखलही घेण्यात आली आहे. बाईकला चारही बाजूंनी एल.ई.डी दिव्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे गस्त घालतांना चारीबाजूंनी निगराणी ठेवता येईल. या बाईक्समध्ये डार्टगन, पाण्याची बाटली, औषधाचे किट, ब्लो पाईप, दोरखंड ठेवण्याची व्यवस्था आहे. दोन आसनी बाईकचा वापर अडचणीत असलेल्या वन्यप्राण्याला जवळ जाऊन मदत करण्यासाठी, त्याला बधीर किंवा बेशुद्ध करण्यासाठी करता येईल. वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण तसेच संनियंत्रण करण्यासाठी, राष्ट्रीय उद्यान तसेच अभयारण्य किंवा वन्यजीवांची संख्या अधिक असणाऱ्या क्षेत्रात या बाईक्सचा उपयोग होईल. (प्रतिनिधी)