शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

" शहरांच्या नामांतरामुळे काहीही फरक पडणार नाही; त्यापेक्षा..." ; भाजपच्या माजी खासदाराचा टोला

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 20, 2021 9:03 PM

एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पक्षाच्या एका माजी खासदाराने मात्र आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून जोरदार घमासान सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी आघाडी व भाजपमधील वरिष्ठ नेतेमंडळी सोडताना दिसत नाही.एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनाकाँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे भाजपच्या एका माजी खासदाराने राज्य सरकारला सल्ला 'हा' खास टोला लगावला आहे. 

भाजपाचे माजी खासदार असलेले संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला परत जाण्याच्या विधानासह इतरही विविध विषयांवर भाष्य केले आहे. काकडे म्हणाले, राज्य सरकारने कोरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणांकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र ते औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबद्दल बोलत आहे. मात्र औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर केल्यामुळे काहीही एक फरक पडणार नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी तो मुद्दा गौण करून तरुणांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असून मी त्याविषयी काही भविष्य सांगू शकत नाही असेही स्पष्ट केले. 

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून पण निवडून आणू..  पुण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. यानंतर त्या वाक्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले नसते तरच नवल. पण यानंतर पाटील यांनी देखील त्या वाक्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. पण आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमधून निवडणूक लढविण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि विशेष म्हणजे या मुद्द्यावर कुणी विरोधकांनी नाहीतर पुण्यातील भाजपच्या माजी खासदारानेच मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जर पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी त्यांचा प्रचारप्रमुख मी असेल. आणि एवढंच नाही तर तिथून सुद्धा चंद्रकांत दादांना निवडून देखील आणू.   .... आमचे ९८ नगरसेवक कुणाच्याही संपर्कात नाही..भाजपाचे ९८ नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. निवडणुकाजवळ आल्या की अशा बातम्या, चर्चा झडत असतात. आणि सर्वच पक्षात थोड्या फार प्रमाणात नाराजी ही असतेच.पण ती नाराजी दूर करण्याचा जे ते पक्ष प्रयत्न करत असतात.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण