Remdesivir Shortage: hetero pharma company that makes remdesivir is closed from two days because of holidays | Remdesivir Shortage: आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

Remdesivir Shortage: आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसीवीर (Remdesivir) लस खूप मोठी संजिवनी ठरत आहे. या लसीचा तुटवडा गेल्या काही काळापासून भासू लागला असून ऐन कोरोनाकाळात ही लस बनविणारी एक मोठी कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आज दिवसभरात राज्याला एकाही नव्या रेमडेसीवीर लसीचा पुरवठा झालेला नाहीय. (hetero pharma production plant closed for two days, Remdesivir Production stopped.)


देशात रेमडेसीवीर लसीचा तुटवडा आहे. यामुळे ही लस मिळविण्यासाठी नागरिक मेडिकलसमोर दिवस-दिवस उभे आहेत. अनेकांना ही लस न मिळाल्याने त्यांचे आप्तस्वकीय गमवावे लागले आहेत. अशातच पुण्यात रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते.


देशात रेमडेसीवीर लस बनविणाऱ्या ७ कंपन्या आहेत. यापैकी एक मोठी कंपनी असलेली हैदराबादची हेट्रो फार्मा (hetero pharma) ही कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे लसीची मोठी गरज असताना ही कंपनी बंद राहिल्याने याचा फटका लसीच्या पुरवठ्यावर झाला आहे. या कंपनीचा हैदराबादचा प्लांट बंद आहे. ही एकटी कंपनी दररोज ३२ हजार लसी तयार करते. गेले दोन दिवस सुटी असल्याने या कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते. अन्य सहा कंपन्या दिवसाला ३० हजार इंजेक्शन बनवितात. या कंपन्यांकडूनेखील महाराष्ट्राला पुरवठा होतो. मात्र, आज दिवसभरात एकही रेमडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळालेले नाहीय. (No Single Remdesivir given to Maharashtra today.)


पुण्यात जी लस उपलब्ध झालीय ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या पातळीवर मिळविलेली आहेत. पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.  


कोणकोणत्या कंपन्या हे इंजेक्शन बनवितात...
हेट्रो ड्रग्ज, झायडस कॅडिला, सिप्ला, डॉ. रेड्डीज, व्हायट्रीस, बायोकॉनची उपकंपनी सिंजीन इंटरनॅशनल आणि ज्युबिलंट फार्मोव्हा या सात कंपन्या रेमडेसीवीर इंजेक्शन बनवितात. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remdesivir Shortage: hetero pharma company that makes remdesivir is closed from two days because of holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.