शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

‘रिलायन्स’-‘टाटा’त रंगले शीतयुद्ध

By admin | Updated: June 19, 2014 03:01 IST

रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील वीज ग्राहकांना विजेचे वितरण करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.गेल्या आर्थिक वर्षात पसरविलेल्या ३३६ किलोमीटर लांबीच्या वीज वितरण जाळ्याचे सक्षमीकरण झाल्याचा दावा टाटा पॉवरने केला असतानाच रिलायन्सदेखील वीज वितरण जाळ्याच्या तपशिलाचा पाढा वाचत आपणही कसे पुढे आहोत? याचे गोडवे गायले आहे. उपनगरातील वीज गाहक एकमेकांकडे खेचण्यासाठी या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये वाद आहे. टाटा पॉवरची वीज रिलायन्सपेक्षा स्वस्त असल्याने उपनगरातील छोटे ग्राहक टाटाकडे आकर्षित होत आहेत. उलटपक्षी उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या विजेच्या दराबाबत रिलायन्सचे दर कमी असून, टाटाचे त्यापेक्षा अधिक आहेत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधील ‘तु तू मैं मैं’ शिगेला पोहोचले आहे की, प्रसिद्धिपत्रके काढत त्यांनी एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी याबाबत सांगितले की, मुंबईत वीज वितरणासाठी खूप कमी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे.रिलायन्सच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटाकडून उपनगरातील वीज ग्राहकांना जी वीज वितरित केली जात आहे; त्यात रिलायन्सच्या वीज वितरण जाळ्याची भूमिका मोलाची आहे. शिवाय रिलायन्सचे उपनगरात २९ लाख ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांची मागणी १ हजार ७५० मेगावॅट एवढी आहे. शिवाय रस्त्यांवरील दिव्यांसाठी रिलायन्सने तब्बल ३१ किमी वीज वितरणाचे जाळे उभारले आहे. तसेच उच्च आणि लघुदाब वीज वितरणासाठीही कंपनीचे मोठे जाळे पसरले आहे. (प्रतिनिधी)