शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली माती, आपली माणसं’चे प्रकाशन

By admin | Updated: May 28, 2015 23:25 IST

‘लोकमत’ पुरंदर तालुक्याच्या ‘आपली माती -आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे पुरंदर तालुक्यात जंगी स्वागत झाले असून, जेजुरी नगर परिषदेच्या सभागृहात पुरवणीचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

जेजुरी : ‘लोकमत’ पुरंदर तालुक्याच्या ‘आपली माती -आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे पुरंदर तालुक्यात जंगी स्वागत झाले असून, जेजुरी नगर परिषदेच्या सभागृहात पुरवणीचे थाटात प्रकाशन करण्यात आले. जेजुरी पालिकेच्या सभागृहात या पुरवणीचे प्रकाशन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना दरेकर, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका साधना दिडभाई, मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त व नगरसेवक सुधीर गोडसे, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मेहबूब पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. तीर्थक्षेत्र जेजुरीच्या प्रत्येक यात्रा-सणांना राज्यभर प्रसिद्धी देऊन जेजुरीच्या धार्मिक संस्कृतीचे महत्त्व वाढवण्याचे मोठे काम ‘लोकमत’च्या माध्यमातून होत आहे. ‘लोकमत’ चा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असून, लोकांचा प्रतिसादही मोठा लाभलेला आहे. ‘लोकमत’ च्या विविध उपक्रमांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडत असल्याचे सांगून, या पुरवणीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध क्षेत्रांचा आढावाच ‘लोकमत’ने वाचकांसमोर मांडला असल्याचे मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे यांनी सांगितले़‘लोकमत’च्या या पुरवणीमुळे तालुक्यातील जडणघडणीची शिवाय ज्ञात-अज्ञात विषयांची, स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. पुरंदरच्या विविध क्षेत्रांची माहती या पुरवणीतून वाचावयास मिळाली. ‘लोकमत’चे विविध नावीन्यपूर्ण प्रयोग खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. अशा उपक्रमांतून महाराष्ट्राचे दर्शन घडत आहे. राज्यभरात विविध उपक्रम राबवून लोकमतने राज्यात क्रमांक १ चे स्थान मिळविले आहे ते यामुळेच, असा माझा विश्वास असून, भविष्यात ‘लोकमत’कडून अशीच परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘लोकमत’च्या उपक्रमांना आदिनाथ अ‍ॅग्रो लि. चे संचालक नितीन गांधी व त्यांच्या पत्नी वैशाली गांधी यांनी शुभेछा दिल्या. प्रारंभी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी बी. एम. काळे यांनी सर्वांचे स्वागत केले़ ‘लोकमत’ च्या या पुरवणीमागचा उद्देश ‘लोकमत’चे ग्रामीण विभाग प्रमुख विवेक भुसे यांनी प्रास्ताविकातून मांडला. ‘लोकमत’ च्या विविध उपक्रमाची माहिती जाहिरात व्यवस्थापक उल्हास पोंक्षे यांनी दिली़ जाहिरात व्यवस्थापक अशोक शिंदे यांनी आभार मानले, आपली माती आपली माणसं’ या पुरवणीच्या माध्यमातून पुरंदरचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. पुरंदरचा इतिहासच शब्दांत मांडून उद्याच्या पुरंदरचे चित्र समोर मांडले आहे. लोकमतचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे़-साधना दरेकर, नगराध्यक्षा, जेजुरी४सध्याच्या काळात लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठे काम मिडियाच्या माध्यमातून होत असल्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जेजुरीत सामाजिक काम करीत असताना जेजुरी रेल्वे स्टेशन आधुनिक स्टेशन व्हावे म्हणून प्रयत्न करताना ‘लोकमत’ने मला नेहमीच साथ दिली, सामाजिक कार्यकर्त्याला आपले वर्तमानपत्र वाटावे अशीच ‘लोकमत’ची भूमिका असल्याचे निदर्शनास येत आहे. भविष्यात सर्वसामान्यांचेच नव्हे तर विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना आपले वर्तमानपत्र वाटेल, असा विश्वास मेहबूब पानसरे यांनी व्यक्त केला. ४साधना दरेकर म्हणाल्या, ‘‘लोकमत’ने अल्पावधीत जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळवला आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या बातम्यांतून वाचकांशी जवळकीचे नाते जोडले आहे, लोकांच्या मतांचा जिथे आदर होतो तेच हे लोकमत वर्तमानपत्र आहे. म्हणूनच लोकमतने सर्वसामान्यांच्या हृदयात अल्पावधीत स्थान मिळवले आहे.’’