सहा डेअरी मालकांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

By Admin | Updated: December 5, 2014 15:00 IST2014-12-05T03:40:02+5:302014-12-05T15:00:29+5:30

जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल दूध भेसळच्या गुन्ह्यांतील संशयित तसेच सहा डेअरी मालक व व्यवस्थापकांनी दाखल केलेले

Rejecting the anticipatory bail of six dairy owners | सहा डेअरी मालकांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

सहा डेअरी मालकांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल दूध भेसळच्या गुन्ह्यांतील संशयित तसेच सहा डेअरी मालक व व्यवस्थापकांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. आर. क्षीरसागर यांनी गुरुवारी फेटाळून लावले.
पाचोऱ्यातील सुशील महेंद्र संचेती, सचिन महेंद्र संचेती यांच्या मालकीच्या सुशील डेअरीतील म्हशीच्या दुधात भेसळ आढळून आली होती. चाळीसगाव पोलीस ठाण्यातील आरोपी हरमोहनसिंग जगतसिंग नागपाल (रा.अंधेरी, मुंबई), दिगंबर लक्ष्मण वार (रा.चाळीसगाव) यांच्या मे. दर्शन डेअरी युनिट आॅफ गुजराथ डेअरीचा परवाना संपलेला असताना डेअरी सुरू होती. कारवाईच्या दरम्यान दुधाच्या पावडरच्या ८५ गोळ्या आढळल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Rejecting the anticipatory bail of six dairy owners