शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पीडित मुरळीचे पुनर्वसन करणार

By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST

अल्पवयीन मुलीचे देवाशी लग्न लावून तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे.

अकोले (अहमदनगर) : अल्पवयीन मुलीचे देवाशी लग्न लावून तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव प्रिया खान यांनी या प्रकरणाची आस्थेने चौकशी केली व मदतीचे आश्वासन दिले आहे. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून पुण्यातील काहींनी पीडित मुलगी व तिच्या बाळास आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बालकल्याण खात्यामार्फत पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मुलीच्या आजीने नवसाची फेड म्हणून तिचे लहानपणीच खंडोबा देवाशी लग्न लावून तिला मुरळी बनवले होते. विविध ठिकाणी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. त्यातून ती गरोदर राहिली व तिने एका मुलीला जन्म दिला. काही स्वयंसेवी संघटनांनी यात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी तिच्या आजीसह तिघांना अटक केली आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे व्रत घेतलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी या मुलीने शिक्षण घ्यावे, यासाठी सलग ९ वर्षे पाठपुरावा केला. मात्र तिला दुर्दैवी फेऱ्यातून वाचवू शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)मला ज्यांनी त्रास दिला त्यांना कठोर शिक्षा घडायला पाहिजे. मी एकटी राहून माझ्या मुलीला मोठं करणार आहे. - शोषित मुलगी