महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:16 IST2025-05-27T18:11:45+5:302025-05-27T18:16:03+5:30
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
Maharashtra Weather IMD Alert: हवामान विभागाला आश्चर्याचा धक्का देत नेहमीच्या वेळेपेक्षा आठवडाभर आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांना मान्सूनने झोपडपून काढले. पुढील ६-७ दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की, ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिमेला कमी मध्यम दाबाचा बट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील ४८ तासात स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह राज्यांना रेड अलर्ट
पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या महाराष्ट्रासह चार राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक आणि किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पुढील ६ ते ७ दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
वाचा >>सावधान... साचलेल्या पाण्यातून चालताय; लेप्टोची लागण होण्याची भीती
२७ ते ३० मे या काळात केरळमध्ये, २७ मे रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट माथा आणि पायथा परिसरात, कर्नाटकातील किनारपट्टी, घाटमाथ्यावर, त्याचबरोबर तामिळनाडूनतील घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बहु मौसम संबंधी चेतावनी
— India Meteorological Department (@Indiametdept) May 27, 2025
मुख्य बिंदु
ओडिशा तट से दूर बंगाल की खाड़ी के उत्तर-पश्चिमी भाग में एक कम निम्न दबा का क्षेत्र बना है। इसके धीरे-धीरे उत्तर की ओर बढ़ने और अगले 48 घंटों के दौरान और अधिक स्पष्ट होने की संभावना है।
पश्चिमी तट (केरल, कर्नाटक, तटीय महाराष्ट्र और गोवा) पर… pic.twitter.com/q7KD5yD5Ml
२७ मे ते २ जून या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. या काळात ४० ते ५० किमी प्रतितास वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात २७ ते २९ मे या काळात वाऱ्यांचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास इतका वाढेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.