निविदांवरील स्वाक्षऱ्या ओळखल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 01:47 IST2015-06-13T01:47:59+5:302015-06-13T01:47:59+5:30

जळगाव येथील घरकूल योजनेच्या कामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा आणि टिपण्यांवर त्या वेळचे नगरपालिकेचे सहायक अभियंता डी. एस.

Recognized Signatures on Nividas | निविदांवरील स्वाक्षऱ्या ओळखल्या

निविदांवरील स्वाक्षऱ्या ओळखल्या

धुळे : जळगाव येथील घरकूल योजनेच्या कामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा आणि टिपण्यांवर त्या वेळचे नगरपालिकेचे सहायक अभियंता डी. एस. खडके आणि मुख्याधिकारी बी. डी. काळे यांच्या स्वाक्षरी होत्या. या स्वाक्षरी घरकूल प्रकरणातील मूळ फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी न्यायालयात ओळखल्या.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या न्यायालयासमोर जळगाव येथील घरकूल प्रकरणाचा खटला सुरू आहे. या खटल्यात गुरुवार आणि शुक्रवारी डॉ. प्रवीण गेडाम यांची साक्ष नोंदवण्यात आली.
नामांकित कंपन्यांच्या निविदा
निविदांसाठी नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र, घरकूल योजनेच्या नऊपैकी नऊ कामांचा ठेका खान्देश बिल्डर्सला आणि इतर तीन कामांचा ठेका गोलाणी ब्रदर्सला मिळाल्याचे गेडाम यांनी न्यायालयाला सांगितले.

Web Title: Recognized Signatures on Nividas