शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:19 IST

काही महाविद्यालयांनी पुस्तके-उपकरणांची बनावट बिले दाखवली, काही प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले.

मुंबई - नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा डी. फार्मसीची ७१ महाविद्यालये आणि बी. फार्मसीच्या १८ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नसून त्याचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. 

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या  शिफारशी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ  आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत या कॉलेजांनी वारंवार उल्लंघन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने पीसीआयकडे केली होती. त्या अनुषंगाने  परिपत्रक काढून या संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यास बंदी घातली. 

ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि सोलापूर महाविद्यालयांचा समावेश 
ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालये या यादीत आहेत. शाहापूरमधील एका फार्मसीने पायाभूत सुविधांची माहिती दिली नाही, तर उल्हासनगरातील एका महाविद्यालयाने अग्निसुरक्षा कागदपत्रेच सादर केली नाहीत. अनेक संस्था अपूर्ण किंवा भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. काही महाविद्यालयांनी पुस्तके-उपकरणांची बनावट बिले दाखवली, काही प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले. नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील काही संस्थांनी जिओटॅग फोटो पुरावा म्हणून दिले. मात्र, ते अपुरे ठरले.

महाविद्यालयांमध्ये या आढळल्या त्रुटी 
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्रांचा अभाव, अपुऱ्या प्रयोगशाळा, अपूर्ण पायाभूत सुविधा, पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि पात्र प्राचार्य नसणे आदी अनेक त्रुटी होत्या. त्यातून अनेक कॉलेजेस गुणवत्ता नसताना केवळ नावाला सुरू होती. 

अनेक काॅलेज विद्यार्थ्यांपासून वंचित
राज्यात गेल्या काही वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमाची महाविद्यालये भरमसाट वाढली होती. त्यामुळे फार्मसी कॉलेजांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. तसेच अनेक कॉलेजांना विद्यार्थीही मिळू शकले नव्हते. त्यामुळे भरमसाट वाढलेल्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेचाही अभाव होता. त्यामुळे त्यांच्यावर चाप आणण्याची मागणी होत होती.

असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाने अनेकदा गरजेपेक्षा जास्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. शैक्षणिक गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सरकार, तंत्र शिक्षण संचालनालय आणि विद्यापीठांनी महाविद्यालयांची नियमित संयुक्त तपासणी करायला हवी.- प्रा. मिलिंद उमेकर, अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Cancels Recognition of 89 Pharmacy Colleges for Violations

Web Summary : Maharashtra's technical education department revoked recognition for 89 pharmacy colleges. Violations included inadequate facilities, missing documents, and fake records. D.Pharm and B.Pharm admissions are now barred for these colleges, following PCI recommendations to ensure quality.
टॅग्स :collegeमहाविद्यालय