शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

बरसल्या शास्त्रीय नृत्य गायनाच्या स्वरधारा

By admin | Updated: June 30, 2014 00:45 IST

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिजात शास्त्रीय संगीताच्या गायन व कथ्थक नृत्याच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. आषाढ महिन्याच्या प्रारंभी अपेक्षित पाऊसधारा न कोसळल्याने

शास्त्रीय मैफिल : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिजात शास्त्रीय संगीताच्या गायन व कथ्थक नृत्याच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. आषाढ महिन्याच्या प्रारंभी अपेक्षित पाऊसधारा न कोसळल्याने काहीशा रुक्ष अशा वातावरणाला गारवा प्रदान करणारी ही मैफिल होती. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. सुप्रसिद्ध गायिका शरबानी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन आणि त्यानंतर प्रतिभावंत कथ्थक नृत्यांगना नेहा बॅनर्जी व पल्लवी शोम यांच्या नृत्याने हा कार्यक्रम रंगला. विख्यात कथ्थक नृत्य गुरु माँ रेवा विद्यार्थी यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणाने आदरांजली अर्पण केली. शरबानी चक्रवर्ती या शास्त्रीय संगीतातील परिचित गायिका आहे. गाजदार आवाज, सुरेल व कसदार गायन वैशिष्ट्य असलेल्या या गायिकेने गुरु पं. अजेय सेन चौधरी, विश्वजीत चक्रवर्ती, मधुसूदन ताह्मणकर, डॉ. मंदा पत्तरकिने व आरती अंकलीकर- टिकेकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. सीमित वेळात राग पुरिया धनश्रीसह संत मीराबाईचे भजन ‘मतवारो बादर आयो हरि का संदेशा कछु नाही लायो..’ तयारीने सादर करून त्यांनी आपल्या गान प्रतिभेचा परिचय रसिकांना दिला. त्यांना तबल्यावर विवेक मिश्र तर संवादिनीवर सोमनाथ मिश्र यांनी साथसंगत केली. यानंतर नेहा बॅनर्जी आणि पल्लवी शोम यांच्या नादमय कथ्थक नृत्याने रसिकांचा ताबा घेतला. या नृत्यांगनांनी सुबक हावभावांचे, लयकारीच्या आवर्तनात भिजलेल्या घुंगरांचे, भिंगरीच्या गतीने फिरणारे कलात्मक सादरीकरणाने उपस्थितांना आनंद दिला. पल्लवी ही विख्यात गुरु रेवा विद्यार्थी यांची तर नेहा पं. बिरजू महाराज यांची शिष्य आहे. नृत्यदेवता नटराजाला वंदन करून त्यांनी शिवस्तुती सादर केली. आकर्षक आणि वेधक नृत्यसौष्ठव, सकस देहबोली आणि परस्पर सामंजस्य यासह नृत्याची ही आनंदपर्वणी होती. ताल त्रितालात कथ्थकचे आमद, तोडे, तुकडे, परण, फर्माईशी, चक्रदार यासह नृत्याची ही जुगलबंदी उपस्थितांना दाद द्यायला भाग पाडणारी होती. फ्युजनने या नृत्याची रंगत अधिक वाढली. त्यांना सोमनाथ मिश्र, विवेक मिश्र, अतुल शंकर-बासरी, प्रसाद शहाणे यांनी सतारीवर अनुरुप संगत केली. त्यांनी राग चारुकेशीच्या सादरीकरणाने आपल्या वादन प्रतिभेचा परिचय दिला. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जे. एम. चंद्राणी, कवी कृष्णकुमार चौबे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक व पल्लवीचे पिता प्रताप पवार, विख्यात नाट्य कलावंत गुरु रेवा विद्यार्थी यांचा पुत्र आशिष विद्यार्थी, प्रा. उत्सवी बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)