शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामागचं कारण समोर; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 09:42 IST

राज्यसभेसाठी राज्यातील भाजप उमेदवारांबाबत चर्चा

चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले, त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. परंतु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधनानंतरची राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादीचे संभाव्य विलिनीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलरोजी संपत आहे. या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत  फडणवीस-शाह यांच्यात चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजपकडून बहुतांश नवीन चेहरे दिले जातील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे गेली तर भाजपची भूमिका काय असावी यावर फडणवीस यांनी शाह यांचा सल्ला घेतल्याचीही माहिती आहे. 

विस्ताराची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुद्धा काही दिवसांपासून राजधानीत रंगली आहे. हा पहिलाच विस्तार असेल.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. यानंतर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचे मध्यांतर किंवा त्यांनतर मंत्रिमंडळाचा विस्तार होवू शकतो. तोवर राष्ट्रवादी एकत्र येईल का आणि त्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis's surprise Delhi visit: Meeting with Amit Shah revealed.

Web Summary : CM Fadnavis met Amit Shah in Delhi, discussing political scenarios post-Ajit Pawar, NCP merger possibilities, and local election success. They also discussed BJP candidates for upcoming Rajya Sabha elections and the potential cabinet expansion after the budget session.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शाहNCPराष्ट्रवादी काँग्रेस