‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:18 IST2025-10-28T15:17:37+5:302025-10-28T15:18:04+5:30
Ravindra Dhangekar Criticize Navnath Ban: भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धंगेकर यांनी बन यांची खिल्ली उडवली असून, हा डोरेमॉन कोण आहे, अशा खोचक प्रश्न समाज माध्यमांमधून विचारला आहे.

‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या सनसनाटी आयोपांमुळे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता भाजपाचे नेते आणि प्रवक्त्यांनी रवींद्र धंगेकर यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धंगेकर यांनी बन यांची खिल्ली उडवली असून, हा डोरेमॉन कोण आहे, अशा खोचक प्रश्न समाज माध्यमांमधून विचारला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी फेसबूकवर नवनाथ बन यांचा एक फोटो शेअर केला असून, त्या फोटोसोबत ‘’ते सगळं जाऊ द्या… मला आधी एक सांगा हा डोरेमॉन कोण आहे?’’ असा सवाल विचारत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी काल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर १२ पक्ष फिरून शिवसेनेच आलेल्या रवींद्र धंगेकर यांची अमित शाह यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही आहे, असा टोला बन यांनी लगावला होता. तर बन यांच्या या टीकेला आज धंगेकर यांनी थेट त्यांचा फोटोच शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. तसेच बन यांना थेट डोरेमॉनची उपमान दिली. तर धंगेकर यांनी केलेल्या टीकेला नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. जर मी डोरेमॉन असेन तर तुम्ही बावळट नोबिता आहात असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.