शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचा निकाल ९६.३४ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 00:59 IST

दहावी परीक्षा : जिल्ह्याचे दणदणीत यश

रत्नागिरी : स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान राखणाऱ्या कोकण बोर्डात दहावी परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक दुसरा असला तरी ९६.३४ टक्के निकालाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. रत्नागिरीच्या सिद्धी बाळकृष्ण झोरे हिने बोर्डात अव्वल येऊन जिल्ह्याच्या यशाला आणखीनच झळाळी दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २६ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.३४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १२ हजार ९५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १२ हजार ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत रत्नागिरीपेक्षा ०.०६ टक्क्याने बाजी मारत अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट यशामुळे सर्वच शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)सायबर कॅफेत गर्दी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनमुळे बहुतांश घरात इंटरनेट सुविधा असल्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर उपलब्ध होताच नंबर पाहण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.१३७ शाळांचा निकाल १०० टक्केरत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३८७ शाळांमधील १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण २६ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १४ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ताप्राप्त केली आहे. प्रथम श्रेणीत ९ हजार ६१५, व्दितीय श्रेणीत ८ हजार २३१, तृतीय श्रेणीत १९९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचा झेंडारत्नागिरी जिल्ह्यातून १३ हजार ८६८ मुलगे परीक्षेला बसले होते, पैकी १३ हजार ३३३ मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.१४ टक्के इतके आहे. तसेच जिल्ह्यातून १२ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १२ हजार ५२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५५ टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.४१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५१.१६ टक्के रत्नागिरी जिल्ह्यातून १२९८ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी बसले होते, पैकी ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ५१.१६ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पैकी १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५०.९४ टक्के इतका निकाल लागला आहे.