शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारार्थींनी समाज सुदृढ करावा!

By admin | Updated: August 2, 2014 02:47 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या विकासासाठी घालविले.

नाशिक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या विकासासाठी घालविले. त्यामुळे पुरस्कारार्थींनी पुरस्कार मिळाले म्हणजे काम संपले असे न समजता समाज सृदृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २०१४-१५ च्या वितरण कार्यक्रमात केले.सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, आयुक्त रणजितसिंह देओल, सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर आदी प्रमुख पाहुणे होते.शिवाजीराव म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक जगातील २७ भाषांत लिहिले गेले आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी दरवर्षी ७५ कोटींची तरतूद करण्यात येते. लहूजी साळवे आयोगाच्या माध्यमातून महामंडळासाठी विकास योजना राबविण्यात येतात. तसेच एकाच वेळी सहा शिष्यवृत्त्या आॅनलाइन देण्यात येऊन त्याचे ३२ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांत राज्यात सव्वादोन लाख घरकुले बांधली. जादूटोणा विधेयकास मंजुरी दिली. महाराष्ट्राला दृष्ट्या आणि क्रांतिकारी नेत्यांची परंपरा आहे. या परंपरेतील रत्नांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण कमी असतानाही शब्दरूपी निखाऱ्यांतून त्यांनी उपेक्षित समाजामध्ये संघर्षाची जिद्द निर्माण केली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राज्यमंत्री संजय सावकारे व सचिव आर. डी. शिंदे यांनीही अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडविला. (प्रतिनिधी)