शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरच्या धान्यापासून शिधापत्रिकाधारक वंचित; राज्यातील २४ लाख जणांना फटका; धान्यवितरणासाठी मुभा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:00 IST

बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये राज्यात सर्वांत मागे आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, गोंदिया, वर्धा, फ परिमंडळ ठाणे, ग परिमंडळ कांदिवली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर शहर या जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक वितरण पूर्ण झाले असले तरी अन्य जिल्ह्यांची धान्य वितरणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

पुणे : उशिरा झालेला धान्यपुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचे धान्य वितरण रखडले आहे. परिणामी, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सुमारे २४ लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळेच उर्वरित धान्यवितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्य सरकारकडे केली. 

बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये राज्यात सर्वांत मागे आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, गोंदिया, वर्धा, फ परिमंडळ ठाणे, ग परिमंडळ कांदिवली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर शहर या जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक वितरण पूर्ण झाले असले तरी अन्य जिल्ह्यांची धान्य वितरणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे शहर व ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांचा नियोजन शून्य कारभार आणि वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी या कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून अन्नधान्य निर्धारित वेळेत पोहोचण्यास विलंब होत आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला आहे. या जिल्ह्यातील काही दुकानांमध्ये डिसेंबरचे धान्य अजूनही पोहोचलेले नाही. परिणामी, धान्य वितरण मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यातील अनेक दुकानांपर्यंत महिन्याचे धान्य महिन्याच्या २५ तारखेनंतर पोहोचत आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

३३५ दुकानांचे धान्य वितरण शून्य
-  डिसेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण ६ लाख ८३ हजार ७७६ एपीएल शेतकरी शिधापत्रिकांपैकी (३.९७ टक्के) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र १ कोटी ६५ लाख ८१ हजार शिधापत्रिकांपैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ४१ लाख ७१ हजार ५८२ शिधापत्रिकांचे धान्य वितरण पूर्ण झाले आहे. 
-  डम्हणजेच राज्यामध्ये अजूनही २४ लाख ९ हजार ४१८ शिधापत्रिकांचे धान्य वितरण प्रलंबित आहे. राज्यात अजूनही ३३५ दुकानांचे धान्य वितरण शून्य टक्के आहे. ७६८ दुकानांचे धान्य वितरण ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, तसेच २ हजार १२० दुकानांचे धान्य वितरण ६० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.