शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

By admin | Updated: May 4, 2015 01:39 IST

रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न

अहमदनगर : रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे सांगितले. राज्यातील पहिल्या बायोमेट्रिक धान्यवाटप उपक्रमाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ धान्य वितरणातील अडचणी दूर केल्या जातील. विभागाचे प्रमुख अधिकारी वितरणातील त्रुटी अभ्यासत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच धान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.धान्यातील काळाबाजाराला आळा बसला पाहिजे, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी सरकारने १०० कोटींची तरतूद केली़ राज्यातील पहिला प्रयोग नगरमध्ये होत असून, नगर जिल्हा धान्य वितरणात राज्यात आदर्श ठरला आहे़ जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या अधिकारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी होत आहे़ दुकानदारांनी नव्या पद्धतीला सहकार्य करावे़ दुकानदारांना धान्य वाटपाचे काम परवडत नाही, याची शासनाला जाणीव असून, कमिशन वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसेच तुटीचाही विचार केला जात असल्याचे बापट यांनी सांगितले.राज्यातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. ‘एपीएल’धारकांना धान्य देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे़ सर्वच स्तरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप केले जाईल़ मात्र त्याआधी धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील़ मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांचीही याबाबत लवकरच बैठक घेऊन वितरणात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचे पोट फाडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असा इशारा बापट यांनी दिला़ (प्रतिनिधी)