शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चार पोलिसांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: July 31, 2014 04:11 IST

याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

ठाणे : चोरीचा माल विकत घेतला आहे, असे खोटे आरोप करून एका भंगार विक्रेत्याला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात डांबून ठेवून त्याच्यासह अन्य एका व्यावसायिकाकडून ४ लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र निकम, संदीप शिर्के, प्रकाश पाटील आणि पोलीस नाईक किशोर थोरात यांच्याविरोधात नौपाडा ठाण्यातच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या घटनेमुळे पुन्हा एकदा नौपाडा पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.वैतीवाडीतील भंगार विक्रेते रूपलाल पटेल यांनी दिलेल्या तक्रारीत, नौपाडा पोलीस ठाण्यातील डी.बी. स्टाफ असलेल्या पाच पोलिसांनी ९ ते ११ जूनदरम्यान त्यांना आर्थिक लाभासाठी बेकायदेशीररीत्या नौपाडा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. तसेच चोरीचा माल विकत घेतल्याचे खोटे आरोप आणि मारहाण करून आरोपी करण्याची धमकी देऊन त्यांच्या पाकिटातील ४ हजार ९०० रुपये तसेच घरातील १५ हजार रुपये काढून घेतले. त्याचबरोबर त्यांचे ओळखीचे व्यावसायिक हरजीलाल पटेल यांचे नाव त्यांच्याकडून वदवून घेत त्यांना सोडण्यासाठी ४ लाख रुपये आणि त्यांच्या दुकानातील तांब्याच्या मालाच्या ५ गोण्या दुकानातून उचलून आणल्या. तसेच चोरीच्या गुन्'ासंदर्भात खोटी कागदपत्रे तयार करून त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षरी घेऊन पुढील तपास सुरू केल्याचे म्हटले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केलेल्या गुन्'ात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई के ली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)