शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रासपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यात हाणामारी, पुतळ्यांची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 14:59 IST

रासपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रासपाच्या महादेव जाणकरांचा पुतळा जाळत आहेत.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर तीन ते चार तरुणांकडून शाईफेक करण्यात आली आहे. शाईपेक करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आणि रासपचे कार्यकर्ते जनवाडी पोलीस स्टेशनसमोर एकमेकांमध्ये भिडले. काल दसरा मेळाव्यात भगवानगडावर महादेव जाणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी तर्फे निशेध केला जात आहे. रासपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रासपाच्या महादेव जाणकरांचा पुतळा जाळत आहेत. रासपा-राष्ट्रवादी हा राजकीय वाद सध्या लोकांध्ये आणि राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय जाला आहे. दरम्यान, शाई फेकणा-या तरुणांना इतर विद्यार्थ्यांनी अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. शाई फेकणा-या चौघा तरुणांना जनवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे हॉस्टेल शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे आहे. भगवानगडावर काल (मंगळवारी) महादेव जानकारांनी बारामती उद्धवस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासापा कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.

राष्ट्रवादीकडून सातारा येथे भगवानगडावरील जाणकरांच्या वकत्वव्याच्या निशेधार्थ रस्ता रोको अंदोलन केले, त्यावेली त्यांनी जाणकरांचा पुतळा जाळला. तर जालन्यात रासपा कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांचा पुतळा जाळला. पुणे येथे रासपाप्रमुख महादेव जानकर यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी यावेळी त्यांच्याकडून निशेध व्यक्त केला जात आहे. लोणावळ्यात शहर व नाणे मावळ राष्ट्रवादीच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे शिवाजी महाराज पुतळा चौकात दहन करण्यात आले. अपशब्द वापरल्याचा यावेळी निषेध करत त्यांच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालत त्याला जोडे मारण्यात आले.