ramdas athawale criticised thackeray govt over shortage of remdesivir | रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला

रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला

ठळक मुद्देरामदास आठवले यांची ठाकरे सरकारवर टीकापंतप्रधान मोदी चांगले काम करतायत - आठवलेकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही - आठवले

मुंबई: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा झालेला उद्रेक भीतीदायक आणि गंभीर होत चालला आहे. मागील सलग काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over shortage of remdesivir)

महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत

देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृत्युंना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये, अशी टीका आठवले यांनी केली.

कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये 

केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीही आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि केंद्र सरकारवर आरोप करू नयेत, असेही आठवले यांनी म्हटले आहे. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

पंतप्रधान मोदी १८ तास काम करतायत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरून परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत. केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढाईत कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही जण या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून फार वाईट वाटते, असे केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ramdas athawale criticised thackeray govt over shortage of remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.