राखी सावंतचा रिपाइंमध्ये प्रवेश

By Admin | Updated: June 29, 2014 00:35 IST2014-06-29T00:35:41+5:302014-06-29T00:35:41+5:30

लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या आयटम गर्ल राखी सावंतने शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला.

Rakhi Sawant's entry into the ripai | राखी सावंतचा रिपाइंमध्ये प्रवेश

राखी सावंतचा रिपाइंमध्ये प्रवेश

>मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या आयटम गर्ल राखी सावंतने शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर राखीकडे महिला कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
वांद्रे येथील एमआयजी कल्बमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राखीच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. राखी सावंतच्या रूपाने रिपब्लिकन पक्षाला स्टार प्रचारक मिळाला असल्याचे, सांगत आठवलेंनी राखी सावंतचे रिपाइंत स्वागत केले. आठवले यांनी तिच्याकडे महिला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. 
जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे राखीने यावेळी सांगितले. गरीब, गरजू आणि महिलांना रिपाइंच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून देणार, असेही राखीने सांगितले.
राखीने विधानसभा निवडणूक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात लढण्याची तयारी दर्शविली. यावेळी आठवले म्हणाले की,  रिपब्लिकन पक्ष वाढविण्यासाठी राखीची मदत होऊ शकते. रिपाइंला व्यापक स्वरुप देण्यासाठी सर्व घटकांना संघटनेत स्थान देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rakhi Sawant's entry into the ripai