Rajya Sabha Election 2026 : मोठी बातमी! राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंनी दिली नव्या चेहऱ्यांना संधी; शिवसेनेचे धक्कातंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:59 IST2026-03-05T13:47:11+5:302026-03-05T13:59:57+5:30
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणूक जाहीर झाली असून काल भाजपाने आणि महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर केले आहेत.

Rajya Sabha Election 2026 : मोठी बातमी! राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंनी दिली नव्या चेहऱ्यांना संधी; शिवसेनेचे धक्कातंत्र
Rajya Sabha Election 2026 :राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली असून देशभरात मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. भाजपासह महाविकास आघाडीनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची नावे आता समोर आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक यांना फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक होते. पण, आता शिंदे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची माहिती समोर आली आहे. या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या असून त्यांनी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळले आहे.
बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार
भाजपाकडून चार उमेदवारांची नावे जाहीर
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तावडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही भाजपाने पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे. या दोन प्रमुख नेत्यांबरोबरच माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही उमेदवार निश्चित करण्यात आला आहे.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत आणि भाजपचे सहकार्य यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. राज्यातील राज्यसभेच्या सातही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले.