शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

Coronavirus: राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 22:22 IST

ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेलराज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहेराजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमालीचे वाढताना पाहायला मिळत आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळनंतर महाराष्ट्रात रुग्णवाढ आढळून आली असून, केंद्र सरकारने राज्य सरकारांना याबाबत काही सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (rajesh tope says thackeray govt is considering night curfew in the state)

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. केरळ व महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे राजेश टोपे यांनी नमूद केले आहे. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक

राज्यात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असतील तर शाळा सुरू करणे शक्य होणार आहे. यासाठी आता राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे, असे राजेश टोपे म्हणाले. केरळमध्ये ओणम उत्सवामध्ये ३० ते ३५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे पाहता आपल्याला सावध होण्याची आवश्यकता असल्याचे टोपे यांनी सांगितले.

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

दरम्यान, राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्यांना सांगितले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार