शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:00 IST

मनसे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र मनसेला लोकसभा निवडणूक लढण्यात रस नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीनंतर ही माहिती समोर आली. मोदी सरकारवर मनसे कडाडून टीका करेल. मात्र लोकसभा निवडणुकीत आम्हाला रस नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही ताकद दाखवू, अशी माहिती मनसेच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता. तरीही राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला सोडण्याची तयारी दर्शवल्याचं वृत्त होतं. यासाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसलादेखील गळ घातली होती. मात्र आता मनसे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंदेखील सूत्रांनी सांगितलं.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. यानंतर मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्यास कायम विरोध दर्शवला. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल, अशी भीती पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसला होणारं उत्तर भारतीय मतदान कमी होऊ शकतं, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे मांडली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा