शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला; दिल्लीतील AI समिटचा उल्लेख करत काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:19 IST

आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.

मुंबई - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. मनसेकडून दरवर्षी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वाना हटके शुभेच्छा दिल्या आहेतच, परंतु त्याशिवाय मराठी माणसांना मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी विशेष सल्ला दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिल्लीतील AI समिटचा उल्लेख करत कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल लोकांना जागरूक केले आहे. त्याशिवाय जास्तीत जास्त लोकांनी AI चा वापर करून मराठी भाषा अधिकाधिक वाढवावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

राज ठाकरे यांनी लिहिलेली पोस्ट वाचा जशीच्या तशी...

आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत.  त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. 

त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच. या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे. 

आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे. 

यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील. आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका. 

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. 

तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.

राज ठाकरे

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray's advice on Marathi Language Day: AI Summit Mentioned

Web Summary : Raj Thackeray urges Marathi speakers to embrace AI for language growth. He emphasizes creating Marathi content, blogs, and podcasts to empower the language in the digital age, highlighting AI's potential for linguistic sovereignty.
टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन