Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 12:53 PM2021-12-05T12:53:36+5:302021-12-05T12:54:17+5:30

MNS Leader Amit Thackeray : ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे महाराष्ट्रभर 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. अमित ठाकरेंनी व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन.

raj thackeray son amit thackeray appeals maharashtra beach cleaning campaign join shares video social media | Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'

Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'

Next

MNS Leader Amit Thackeray Campagn: महाराष्ट्रातील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुढाकार घेतला आहे. ११ डिसेंबर रोडी सकाळी १० ते १ या कालावधीत मनसेद्वारे महराष्ट्रात 'समुद्र किमारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS leader Raj Thackeray) यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी यांनी व्हिडीओ शेअर करत मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

"मी आज माझ्या मनाच्या जवळचा एक मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलोय. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. परदेशातील समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि सुंदर का असतात असं कोणालातरी मनात वाटतच असेल, आपल्या राज्यातील का असू शकत नाही. आपल्याला एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे," असं आवाहन अमित ठाकरे व्हिडीओद्वारे करताना दिसत आहेत.

केवळ सरकारवर अवलंबून नको
"फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जगभरातील विविध देशात समुद्राचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोहीम राबवली जाते. सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसेंबरपासून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीनं हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे," असंही ते व्हिडीओद्वारे म्हणाले.

Web Title: raj thackeray son amit thackeray appeals maharashtra beach cleaning campaign join shares video social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app