शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे", भाजपाने राज ठाकरेंना कोणत्या मुद्द्यावरून डिवचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:57 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला भाजपाने उत्तर देत डिवचले. 

"मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती", असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. या टीकेवरून भाजपानेराज ठाकरेंवर पलटवार केला.  "संघ शंभर वर्षे वाटचाल करून समाजमान्य झाला, तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोनचार दशकांतच संपले. याचा आधी विचार करा!", असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंना लगावला. 

राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सरसंघचालकांच्या कार्यक्रमावर आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केले. 'भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे', या मोहन भागवत यांच्या विधानावर राज ठाकरेंनी बोट ठेवले.

सरकारी भीतीमुळे ते लोक आले होते

राज ठाकरे म्हणाले की, "मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या!", असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. 

भाजपाचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर  

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, "राज ठाकरे म्हणतात, सरकारी भीतीमुळे मोहन भागवत यांच्या रटाळ कार्यक्रमाला लोक आले."

"राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे. ज्या पद्धतीने मनसेच्या खळखट्याकच्या भीतीने लोक येतात, तसंच इतरत्रही होत असावं, असा समज करून घेणं चुकीचं आहे. संघाच्या कार्यक्रमांना लोक शिस्तीने, स्वेच्छेने येतात. संघाच्या शाखा, संचलन आणि बहुतांश कार्यक्रम हे पहाटे किंवा सकाळी होत असतात. त्यामुळे ते आपल्याला दिसत नसतील, इतकंच", अशा शब्दात भाजपाने राज ठाकरेंना डिवचले. 

"आपली विश्वासार्हता संपली, संघाला सल्ले देण्याची गरज नाही"

"संघ शंभर वर्षे वाटचाल करून समाजमान्य झाला, तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोनचार दशकांतच संपले. याचा आधी विचार करा!", असा सल्लाही भाजपाने राज ठाकरेंना दिला आहे. 

"राहिला प्रश्न, मराठी भाषा आणि अस्मितेचा… होय, मराठी भाषा अभिमानाचीच गोष्ट आहे. पण कोणतीही भाषा ही संवादाचं माध्यम असायला हवं, संघर्षाचं नव्हे. मराठीचा आग्रह धरताना इतर भाषांचा द्वेष सुरू झाला, आणि त्या द्वेषातून दोन बळी गेले, तेव्हाच या मुद्द्यावरची आपली विश्वासार्हता संपली. म्हणून संघाला सल्ले देण्याची गरज नाही. संघ संवादाचा आग्रह धरतो, संघर्षाचा नाही", असे उत्तर केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या टीकेला दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Slams Raj Thackeray: Stop Misunderstanding RSS Popularity, Focus on MNS.

Web Summary : BJP rebuked Raj Thackeray's criticism of Mohan Bhagwat, stating RSS's popularity is genuine, unlike MNS's fear-based following. BJP advised Thackeray to reflect on MNS's declining relevance.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाmarathiमराठीPoliticsराजकारण