शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:38 IST

Raj Thackeray: विधानभवनाच्या दारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेलाच आता प्रश्न विचारला आहे. 

Raj Thackeray Latest News: "काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?", असा उद्विग सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज ठाकरे यांनी विधानभवन परिसरात झालेल्या राड्यावर संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाबद्दल खंत व्यक्त करताना महाराष्ट्रातील जनतेलाच प्रश्न विचारला आहे. 

पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांचा राडा, राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?"

आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत?

"मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं", अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. 

वाचा >>राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

"माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?", असा सवाल राज ठाकरेंनी केला. 

"अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी  वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये...  सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का?", असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

भविष्यात आमदारांचे खून पडले तरी...

"या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही", असे विधान राज ठाकरेंनी केले.

"माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ  आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका", असा इशारा राज ठाकरेंनी दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड