शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस; पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 19:20 IST

गुरुवारी पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ

पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी; तसेच विदर्भात अनेक ठिकाणी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार वर्षाव झाला. पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, ५ मार्च रोजी विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ३५.९ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान नांदेड येथे १४.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सोलापूर ८, उस्मानाबाद ७, माढा ६, औरंगाबाद १.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव झाला़ औरंगाबाद, तसेच विदर्भातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात २ ते ४ मार्च दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.५ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भRainपाऊसweatherहवामान