शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 8:33 PM

मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वार्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदविले गेले.

राज्यातील सध्याच्या हवामानाबाबत ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे समुद्रावरुन येणारे वारे बाष्प घेऊन येत आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यावर वारे हे चक्राकार पद्धतीने घड्याळाच्या उलट दिशेने फिरुन दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहेत. हे सध्या तीन ते साडेचार किमी उंचावरुन वाहत आहेत. वारे जसे उंच जातात तसे त्यांचे तापमान कमी होते. ५ किमी उंचीवर त्यांचे तापमान शुन्य अंश सेल्सिअस इतके होऊन वार्यांमधील बाष्पाचे गारांमध्ये रुपांतर होते. अशा गारांचे संख्या वाढली व खालून येणार्या वार्यांपेक्षा त्यांचे आकारमान व वजन जास्त झाले की ते खाली येतात व गारपीट होते. मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

१३ डिसेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, नाशिक, पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १३, १४ व १५ डिसेंबर रोजी अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १४ व १५ डिसेंबर रोजी गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात १५ व १६ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे............

पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यताशहरात पुढील दोन दिवस आकाश अशंत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमान १७.९ अंश सल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ६.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामानVidarbhaविदर्भ