शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

कोकणात पावसाचा जोर ओसरला, मराठवाड्यात भिजपाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 5:15 AM

सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे.

मुंबई/पुणे : सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी भिजपाऊस झाला.पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तीन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच १६ जुलैला मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातपावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. संगमेश्वर तालुक्यात तळेकांटे येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात बºयापैकी पाऊस झाला. उर्वरित भागात हलक्या सरी पडल्या.नगर जिल्ह्यात भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊश झाला. घाटघर येथे २४ तासांत तब्बल सव्वा सात इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.मराठवाड्यात भिजपाऊसअर्ध्या मराठवाड्यात भिजपाऊस झाला. जालना शहरासह परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने कोमेजू लागलेल्या कपाशी, मका, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. वडवणी तालुक्यात दहा दिवसांनी रिमझिम पाऊस झाला. केज, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई तालुका तसेच परभणी जिल्ह्यात दिवसभर भुरभूर पाऊस होता.>शनिवारी दिवसभरात महाबळेश्वर ३९, जळगाव ६, नाशिक २, सांगली, सातारा ३, मुंबई १, सांताक्रूझ ७, अलिबाग ३, भिरा ३०,औरंगाबाद ७, बुलढाणा १९, गोंदिया येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

टॅग्स :Rainपाऊस