शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

Rain Alert : परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपले; २२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 8:27 PM

नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथे येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता..

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी आणखी ठळकनाशिक, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले असून येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे.त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी आणखी ठळक झाले आहे.त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात अकोले, कोपरगाव, पाथर्डी, पुणे, येवला ६० मिमी, जामखेड, ओझर ५०, शिरपूर ४०, चाळीसगाव, चांदवड, इगतपुरी, खेड राजगुरुनगर, माळशिरस, निफाड, पुरंदर, शेवगाव येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली होती.  मराठवाड्यातील भीम, वैजापूर, औरंगाबाद, बदनापूर, जाफराबाद, कैज, पाटोदा, शिरुर कासार येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता ओमानच्या दिशेने सरकले असून त्याचा धोका टळला आहे.  

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल़ २१ व २२ ऑक्टोबर रोजी त्यात थोडी वाढ होण्याची शक्यता असून २३ व २४ ऑक्टोबरला मॉन्सून राज्यातून परतीच्या वाटेवर असेल.२५ ऑक्टोबरपासून राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन मॉन्सूनची दक्षिणेच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.  

* सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात २० ते २२ ऑक्टोबर या तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा       इशारा देण्यात आला आहे.* २० ऑक्टोबर रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.* २१ ते २३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. * नांदेड, लातूर जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अन्य जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस      पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी