This is the question with anyone who wants to fight in Maharashtra - Chief Minister | महाराष्ट्रात आता लढायचं कुणाबरोबर हाच प्रश्न आहे - मुख्यमंत्री 
महाराष्ट्रात आता लढायचं कुणाबरोबर हाच प्रश्न आहे - मुख्यमंत्री 

ठळक मुद्दे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौºयावर- मंगळवेढा व माळशिरस विधानसभा मतदारसंघात घेणार प्रचार सभा- मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

सोलापूर/ मंगळवेढा  : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात सामील करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन्हींही पक्षावर उपहासात्मक पध्दतीने टिका सुरू केली आहे. महाराष्ट्रात आता लढायचं कुणाबरोबर हाच माझ्यापुढे प्रश्न आहे असा सवाल त्यांनी गुरूवारी सकाळी येथे मंगळवेढा येथे झालेल्या जाहीरसभेत उपस्थित केला.

मागील पाच वर्षाच्या काळात भाजप सरकारने एकही भ्रष्ट्राचार न करता पारदर्शक कारभार केला आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याबरोबरच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम भाजप सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभानिवडणूकीत विरोधकांचे म्हणावे तेवढे आमदार निवडून येतील का नाही शक्यता आहे असेही ते म्हणाले़

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील दोन दिवसांपुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत दिले, हे संकेत नसून विरोधी पक्षात बसण्यासाठीची धडपड सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यानी सुशीलकुमार शिंदे यांना नाव घेता टोला लगाविला़  याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात सातत्याने येणाºया महापूरचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळा भागात वळविणार आहे़ त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे़ तसेच मंगळवेढ्यातील बसवेश्वर व चोखोबा स्मारक लवकर पूर्णत्वास येईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.


 


Web Title: This is the question with anyone who wants to fight in Maharashtra - Chief Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.