पुणेरी मिसळ -  नव्या प्रदेशात शूर शिपाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 17:00 IST2019-10-02T16:58:11+5:302019-10-02T17:00:30+5:30

चंद्रकांत दादा कोथरुडमधून लढणार हे आता निश्चित झालं आहे..नाराज कोथरूडकरांचे मन जिंकण्याचा ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार .. त्याचाच एक नमुना..

Puneri Misal - brave soldier in new area ! | पुणेरी मिसळ -  नव्या प्रदेशात शूर शिपाई !

पुणेरी मिसळ -  नव्या प्रदेशात शूर शिपाई !

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांच्या गाजलेल्या ' शूर शिपाई ' या कवितेवरून आम्हाला सुचलेली ही कविता... अर्थातच केशवसुत यांची विनम्रपणे माफी मागून...

नव्या युगातील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
कोल्हापुरी पहिलवान मी, जरी नसे कोथरूडचा
जिंकेनच मी लढाई, जरी नसेन या प्रदेशाचा ।। १।।

मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे
रयतेला मी गृहीत धरतो, जरी 'बाहेर' चा आहे
जिकडे जावे तिकडे माझी सर्व भावंडे आहेत
सर्वत्र खुणा आताच विजयाच्या मज दिसताहेत ।।२।। 

कोल्हापूरचा 'पूरग्रस्त' मी आलो तुमच्या दारात
नाराजी सोडून, पाठिंबा द्या मला तुम्ही जोरात
' ताई ' गेली तरी ' दादा' आला, भाग्य तुमचे माना 
लढणार मी, मैदान मारणार, जरी नाराज ' सेना ' ।।३।।

' पालक' च आहे मी, काढेन रुसवा ह्यताईह्णचा
भाऊबीज ओवाळणीने ठेवेन अखंड धागा प्रेमाचा
झाली चिखलफेक, तरी त्रास नसे या चिखलाचा
विसरू नका चिखलातच जन्म होतो ह्यकमळाह्णचा ।।४।।

नवखा आहे म्हणून मी, अस्वस्थता आहे जनी
कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वाटे हीच मनी
तरीही साम्राज्य स्थापेन, येता काळ माझाच आहे
प्रेषित ह्यनमोह्णचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहे... ।।५।।

- अभय नरहर जोशी-

Web Title: Puneri Misal - brave soldier in new area !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.