दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:44 IST2024-11-13T13:39:38+5:302024-11-13T13:44:02+5:30
पुण्यातील एका ४० वर्षांच्या महिलेने चुकून टूथब्रश गिळला आहे. ही महिला ब्रश करत होती.

दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
आपण अनेकदा लहान मुलांनी खडू गिळला, रुपयाचा कॉईन गिळला हे ऐकतो. सुप्रसिद्ध मराठी सिनेमामध्ये लक्ष्याने गोटी गिळल्याचा सिनही अनेकांना आठवत असेल. पण आता पुण्यात एका महिलेने चक्क टूथ ब्रश गिळला आहे. १५-२० सेमी लांब असलेला टूथब्रश कसा काय गिळला गेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सामान्य लोक सोडा तर पुण्याचे भले भले डॉक्टरही या घटनेने चकीत झाले आहेत.
पुण्यातील एका ४० वर्षांच्या महिलेने चुकून टूथब्रश गिळला आहे. ही महिला ब्रश करत होती. यावेळी ती जीभ ब्रशने घासत होती. तेव्हा तिला ओकारी आल्यासारखे झाले आणि कळत नकळत तिने ब्रश गिळला आहे. यानंतर या महिलेला पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला यातून वाचविण्यासाठी एका परदेशी उपकरणाखाली दाबून ठेवले गेले होते.
डॉक्टरांना या घटनेची माहिती मिळताच ते देखील हैराण झाले आहेत. या महिलेवर उपचार करणारे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. अभिजित कराड यांनी हे प्रकरण मला तर अशक्यच वाटत होते. जगभरातील ही दुर्मिळ घटना आहे. आतापर्यंत जगभरात अशाप्रकारची ३० प्रकरणे समोर आली आहेत.
मानसिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या लोकांसोबत अशा प्रकारच्या घटना घडण्याचा धोका जास्त असतो. स्क्रिझोफेनिया, बुलिमिया किंवा एनोरेक्सिया अशा रोगांनी पिडीत असलेल्या लोकांसोबत या घटना घडत असतात. हा ब्रश २० सेमीचा होता असे डॉक्टरांनी सांगितले.