शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुणे: एटीएम फोडताना पोलिसांनी रंगेहात पकडले, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 10:55 AM

रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शटर बंद करून एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात येत होतं...

पुणे : वाघोली येथील साई सत्यम परिसरात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना रंगेहात पकडण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व माऊली कुलथे यांनी दोघांना रंगेहात पकडले असून अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

रिशी चंदेश्वर शर्मा वय २९ व गणेश नीचंद्र ठाकुर वय १९ दोघं रा. दत्तमंदिराजवळ, लोहगाव रोड, मुळगाव बिहार असे एटीएम फोडणा-या दोघांची नावे असून एटीएमच्या बाहेर पाळतीवर असणारा विजय रामचंद्र कदम रा.(पवारवस्ती) हा फरार झाला आहे. साई सत्यम परीसरात रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शटर बंद करून एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती रात्र गस्तीवर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यांनी तात्काळ तक्रार करणार्या व्यक्तिशी संपर्क साधून एटीएम समोर आले होते. त्याचबरोबर बीटमार्शलला ही याबाबत कळविण्यात आले. शटर बंद व चोरट्यांकडील शस्त्रे याबाबत अनभिज्ञ असल्याने तोरडमल व चालक माऊली कुलथे यांनी धाडस करत शटर खोलून दोघांना रंगेहात पकडले.  पोलिस व चोरट्यांमधे धरपकडही झाली होती. यानंतर बीट मार्शल मधील अमोल लांडगे, हिमराज जगताप चोरट्यांना पकडण्यासाठी दाखल झाले होते. दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पाळत ठेवणा-या विजय कदम याचा शोध पोलीस घेत आहेत. लोणीकंद पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईने  ग्रामास्थांकडून कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेatmएटीएमThiefचोरPoliceपोलिस