शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

पुणे: आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन परदेशी तरूणी आणि दोन मॉडेलची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 8:33 AM

या महिला एजंट फ्री लान्स इव्हेट मॅनेजमेंटचे काम करतात़ त्यादरम्यान नव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणा-या मॉडेल्स, स्ट्रगलिंग करणा-या मॉडेल, तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मॉडेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो़

पुणे : आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणा-या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दक्षिण विभागाच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने दोन महिला एजंटांना अटक केली आहे. उझबेकिस्तान आणि रशिया येथील दोन परदेशी महिला, तसेच मूळच्या दिल्लीच्या राहणा-या सध्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी आलेल्या 2 मॉडेल यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले.

याबाबत सहायक पोलीस आयुक्त समीर शेख आणि गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजेमाने यांनी माहिती दिली़ मुंबई येथून दोन स्त्रिया एजंट मॉडेलिंग करणा-या मुली व परदेशी मुलींना घेऊन वेश्याव्यवसायासाठी पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी बनावट गि-हाईकाच्या माध्यमातून या स्त्रियांबरोबर संपर्क साधला़ त्यांनी रात्री दहा वाजता हॉटेल आॅर्चिडसमोरील चौकामध्ये ओव्हर ब्रीजखाली येत असल्याचे कळविले.

त्याप्रमाणे गुन्हे शाखा व हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या पथकाने सापळा रचला़ एका मोटारीतून या दोन स्त्रिया व एक मुलगी आली. त्यापाठोपाठ आणखी एका मोटारीतून तीन मुली आल्या़ बनावट गि-हाईकाने त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून इशारा करताना पोलीस पथकाने त्यांना पकडले. या दोन्ही महिला एजंट मुंबईतील अंधेरी येथील राहणा-या आहेत.

या महिला एजंट फ्री लान्स इव्हेट मॅनेजमेंटचे काम करतात. त्यादरम्यान नव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणा-या मॉडेल्स, स्ट्रगलिंग करणा-या मॉडेल, तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मॉडेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. या व्यवसायात यातील दलाल हे तारांकित हॉटेललाच प्राधान्य देतात़ त्याशिवाय उच्च दर्जाची दारू, सिगारेट इत्यादीची व्यवस्था मुलीला घेऊन जाणा-या ग्राहकाला करावी लागते. ग्राहकाला त्याच्या नावावर रूम बुक करून त्या हॉटेलचे नाव व रूम नंबर एजंटला कळवावे लागते.

मॉडेलिंग करणा-या या मुली 22 व 25 वर्षांच्या असून परदेशी मुली 26 व 27 वर्षांच्या आहेत़ या परदेशी मुली नोव्हेंबरमध्ये ट्युरिस्ट व्हिसा घेऊन आल्या होत्या़ या दलालांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅकेट असून मलेशिया, नेपाळ, हाँगकाँग या ठिकाणी यापूर्वी या परदेशी मुली जाऊन आल्या आहेत़ मॉडेलिंग करणा-या मुली अनेक व्हिडिओ साँगमध्ये असून त्यांच्यातील एकीने दक्षिणेतील एक चित्रपटही आता साईन केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजेमाने, निरीक्षक अरुण वायकर, सहायक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, वैशाली धुमाळ, सहायक उपनिरीक्षक राजाराम सुर्वे, राजेंद्रसिंग चौहान, रवींद्र कदम, शंकर जाभळे, प्रशांत पवार, गणेश साळुंके, प्रवीण तापकीर, रमेश चौधर, प्रवीण पडवळ, कैलास साळुंके, अजय उत्तेकर, विवेक जाधव, किरण ठवरे, राकेश खुणवे, पोलीस नाईक कुंभार, मोरे, चांदगुडे, पागिरे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाsex crimeसेक्स गुन्हा