वाद, फोन लागेना, शेवटचा मेसेज केला आणि दरीत मारली उडी, पत्नीच्या वाढदिवसादिवशीच पतीनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:32 IST2026-02-13T13:31:43+5:302026-02-13T13:32:12+5:30

Pune Crime News: पत्नीसोबत झालेले मतभेद, सतत होणारे वाद यामुळे वैतागलेल्या एका आयटी कर्मचाऱ्याने लोणावळा येथील लायन्स पॉईंट येथून खोल दरीत उडी मारून जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime News: Argument, phone not working, last message sent and jumped into the valley, husband took extreme step on wife's birthday | वाद, फोन लागेना, शेवटचा मेसेज केला आणि दरीत मारली उडी, पत्नीच्या वाढदिवसादिवशीच पतीनं उचललं टोकाचं पाऊल

वाद, फोन लागेना, शेवटचा मेसेज केला आणि दरीत मारली उडी, पत्नीच्या वाढदिवसादिवशीच पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पत्नीसोबत झालेले मतभेद, सतत होणारे वाद यामुळे वैतागलेल्या एका आयटी कर्मचाऱ्याने लोणावळा येथील लायन्स पॉईंट येथून खोल दरीत उडी मारून जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीरेंद्र सिन्हा असं मृत आयटी कर्मचाऱ्याचं नाव असून, तो हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत काम करत होता. कौटुंबिक वादातून वीरेंद्र सिन्हा याने गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी पत्नीच्या वाढदिवसादिवशीच टोकाचं पाऊल उचलून आयुष्याची अखेर केली. दरम्यान, अखेरच्या क्षणी त्याने पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा नंबर ब्लॉक असल्याने तो पत्नीशी बोलू शकला नाही, अखेरीस पत्नीला आणि मित्रांना मेसेज आणि व्हिडीओ पाठवले आणि नंतर खोल दरीत उडी मारली, अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वीरेंद्र सिन्हा आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होता. याचदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री वीरेंद्र हा कार घेऊन लायन्स पॉईंटजवळ आला. कारमधून उतरल्यावर त्याने पत्नीशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याचा फोन नंबर ब्लॉक केलेला असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर वीरेंद्र याने मित्रांना तसेच पत्नीला मेसेज आणि ई मेल पाठवून आपण जीवन संपवणार असल्याची कल्पना दिली. मग काही वेळातच त्याने खोल दरीत स्वत:ला लोटून देत जीवनाचा शेवट केला.

दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोलिसांना वीरेंद्रची कार बेवारस स्थितीत आढळून आली. त्या आधारावर आजूबाजूच्या परिसरासह खोल दरीमध्ये शोध घेतला असता वीरेंद्रचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक बचाव पथकाच्या मतदीने संध्याकाळी वीरेंद्रचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यया प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 

Web Title : पत्नी के जन्मदिन पर बहस के बाद आईटी पेशेवर ने की आत्महत्या

Web Summary : लोनावला में एक आईटी पेशेवर ने पत्नी से विवाद के बाद आत्महत्या कर ली। पत्नी तक पहुंचने में विफल रहने पर उसने लायंस पॉइंट से छलांग लगा दी, और उसके लिए और दोस्तों के लिए संदेश छोड़ गया। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : IT Professional Ends Life on Wife's Birthday After Argument

Web Summary : An IT professional in Lonavala tragically ended his life after disputes with his wife. He jumped from Lion's Point after failing to reach her, leaving messages for her and friends. Police are investigating the case.