शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - बेंगलुरु महामार्ग आठ दिवसांच्या कालावधीनंतर उद्यापासून वाहतुकीसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 20:21 IST

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून बेंगलुरू महामार्गावरून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक ठप्प होती...

पुणे : बेंगलुरू महामार्गावरील शिरोली गावात महापुराचे पाणी आल्याने मागील आठवडाभरापासून बंद असलेली रस्ते वाहतुक मंगळवार (दि. १३) पासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या कालावधीनंतर स्वारगेट आगारातून पहिली एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सांगलीकडे जाणाºया रस्त्यावर अद्याप पाणी असल्याने याभागात एसटी बंदच राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून बेंगलुरू महामार्गावरून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक ठप्प होती. शिरोली आणि किणी गावात तसेच बेळगावीकडून कोल्हापुरकडे येताना निपाणीजवळ महामार्गावर पुराचे पाणी आले होते. रविवारपर्यंत शिरोली आणि किणी गावातील पाणी काही प्रमाणात कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तु असलेली काही मोठी वाहने सोडण्यात आली. तर पाणीपातळी आणखी कमी झाल्याने सोमवारी दुपारनंतर अन्य वाहनेही सोडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, आठ दिवसांपासून एकही वाहन न गेल्याने हजारो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्ता बंद असल्याने एसटी महामंडळाकडून कोल्हापुरकडे जाणाºया सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता वाहतुक सुरू झाल्याने महामंडळाकडून मंगळवारी पहिली बस सोडण्यात येणार आहे.स्वारगेट आगारातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसचे संचलन होते. या आगाराचे व्यवस्थापक पी. एल. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून कोल्हापुरकडे वाहने जाण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या मार्गावर वाहनांची गर्दी तसेच तिकडे जाणारे प्रवासी नसल्याने एसटी बस सोडण्यात आली नाही. मंगळवारपासून बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बस वाढविण्यात येतील. सांगलीकडे जाणारा मार्ग अद्याप बंदच आहेत. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या बस पुर ओसरेपर्यंत बंदच राहतील. एक-दोन दिवसात हा मार्गही सुरू होईल, अशी शक्यता आहे. ------------

 

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगलीRainपाऊसfloodपूर